सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔷🔶
पढवण-वाली पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे,माध्य.विद्यालय पढवणच्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत प्रेरणा शिवाजी कदम ८२.४०% गुण संपादित करून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.तर विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे.
पढवण-वाली विभागात शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या या विद्यालयाचे स्थापनेपासून एस.एस.सी.बोर्ड परीक्षेचा निकाल कायमच चांगला लागत आला आहे. तर याही वर्षी आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत विद्यालयात द्वितीय क्र.राखी रविंद्र कांबळे ८२.००%,त्रुतीय क्र.मनाली महादेव भौड ७६.६० %,चतुर्थ क्र.प्रणाली केशव सकपाल ७५.४० % यानी तर पंचम क्र.निकिता नंदू पानावकर व किरण जनार्दन मोरे ७१.२० % इतके गुण प्राप्त करून पटकावला आहे.
विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब भौड,उपाध्यक्ष मनोहर जाधव,सचिव हिरू कोतवाल,खजिनदार साधुराम पिंपळे, बांधकाम सभापती जनार्दन भौड,शाळा समिती चेअरमन चंद्रकांत कोतवाल साहेब,संस्था सदस्य अजय तावडे, मुख्याध्यापक-बळीराम चव्हाण , वर्गशिक्षक संजीव शेरमकर व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment