
आज शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ बालदिना निमित्त रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम दिव्यांग बालगृह मानखुर्द येथे खाऊ व दिपावली फराळ वाटप करण्यात आले. तदप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत महादेव गुजर उपाध्यक्ष श्री रमेश आगरे सचिव श्री दिनेश धामणस्कर व कार्यकारणी सदस्य सौ. समीक्षा भाइजे,वैभव गुरसाळे, प्रीती शेलार, दिनेश नरळकर हे उपस्थित होते.
बालगृहाच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा मॅडम व त्यांच संपूर्ण कर्मचारी वृंद उपस्थित होते. अत्यंत उस्ताहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात दिव्यांग मुलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून दिसत होता. मुख्याध्यापिका यांनी संपूर्ण बालगृह व तेथील मुलांनी केलेले कौशल्य, पणती बनवणे, कंदील तयार करणे, शिलाई काम, तोरण तयार करणे अशा अनेक गोष्टी दाखविल्या. अनेक गुणी खेळाडू जिल्ह्या , राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार केले.
या सर्व गोष्टी बघून अक्षरशः मन हेलावून गेले. रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत महादेव गुजर यांनी तेथील मुख्याध्यापिका यांना शबद व आश्वासन दिले की रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने आम्ही दरवर्षी दिवाळी या सर्व दिव्यांग मुलां सोबत साजरी करणार आहोत . अतिशय सुंदर कार्यक्रम साजरा झाला. शेवटी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम दिव्यांग बालगृह मानखुर्द यांच्या वतीने आभार मानले गेले व कार्यकमाचा समारोप झाला.



Be First to Comment