
पनवेल, दि.७ (वार्ताहर) : ‘पहिला दिवा देवाच्या चरणापाशी, एक दिवा जिजाऊ चरणी, तर एक दिवा शिवचरणी…’ या भावपूर्ण संकल्पनेतून पनवेलमधील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘दीपोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार सुरेश भगत यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पनवेलकर नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
दीपोत्सवाची सुरुवात देवाच्या चरणी पहिला दीप प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी ‘स्वरगर्जना ढोल-ताशा पथका’च्या दमदार वादनाने परिसर दुमदुमून गेला. आकर्षक फायर शो आणि तरुणाईसाठी आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. प्रकाश, भक्ती आणि शिवविचारांचा संगम साधणाऱ्या या सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दीपावली हा केवळ दिव्यांचा आणि आनंदाचा सण नसून कुटुंबासोबतच समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा देणारा उत्सव असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराची प्रेरणा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशसेवेचे कार्य करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशासह पनवेलमध्येही विविध विकासकामे, सोयी-सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजपचे पदाधिकारी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दीपोत्सवाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजक केदार भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. केदार भगत वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले कार्य करीत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
या सोहळ्याला परेश ठाकूर, अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, सभापती अजय बहिरा, सभापती ममता प्रीतम म्हात्रे, नगरसेवक सुमित झुंजारराव, गणेश कडू, राजू सोनी, अनिल भगत, माजी नगरसेविका सारिका भगत, सुरेखा मोहोकर, अमित ओझे, प्रीतम म्हात्रे, प्रभाकर बहिरा, रुपेश नागवेकर, पवन सोनी, रघुनाथ बहिरा, आनंद ढवळे, हिमेश बहिरा, अनिमेश ओझे, विशाल सावंत, नीता माळी, निकिता पाटील, गीतांजली भगत, हर्षला पाटील, प्रीती गायकर, निर्मिती म्हसकर, दीपाली म्हसकर, शेषनाथ गायकर, हर्षद गडगे, सुमित दसवते, चेतन डुकरे, ब्रिजेश बहिरा, यज्ञेश पाटील, संकेत दसवते, संतोष वर्तले, भावेश शिंदे, सचिन जाचक, अथर्व पाटील, सचिन भगत, योगेश साळवी, फिरोज शेख, मुकेश घोणे, आनंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भक्ती, परंपरा, शिवविचार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ठरलेला हा दीपोत्सव पनवेलकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.


Be First to Comment