Press "Enter" to skip to content

हभप महादेव बाबा यांचा एकोणिसावा पुण्यस्मरण सोहळा साजरा

पेण, ता. 7 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील रहिवासी असणारे हभप.महाराज महादेव बाबा यांचा एकोणिसावा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन यासह विविध प्रवचनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

युवा कीर्तनकार प्रशांत महाराज वर्तक यांनी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या अभंगावर तरुण पिढीला जागे करणारे असे सुंदर विचार मांडत वै.महादेव बाबांनी गुरु सेवा कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले याचवेळी महादेव बाबा शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट च्या माध्यमातून अध्यक्ष कृष्णा वर्तक यांना येत्या काही दिवसांत 80 वर्ष पूर्ण होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांचा वस्त्रदानाद्वारे सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रामांंतर्गत येथील
दहावीच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचा वाटप करण्यात आले.तर यावेळी उपस्थितांचे श्रीफळ आभार मानण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.