Press "Enter" to skip to content

मनात जीद्द ठेवल्यास विजय निश्चित प्राप्त होतो- क्रिकेटर केदार जाधव ; पेणमध्ये टर्फ क्रिकेट मैदानाचे लोकार्पण

पेण (वार्ताहर) : मैदानावर कोणताही खेळ सुरू असताना आपल्या मनात जिंकण्याचे उद्दिष्ट मनात ठेवून मेहनत आणि जिद्द केली तर विजय हा निश्चितच प्राप्त होतो असा प्रेरणादायी संदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी उपस्थित खेळाडूंना दिला.

पेण शहरातील नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या टर्फ क्रिकेट मैदानाचे लोकार्पण प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.तर या नव्या मैदानामुळे पेणमधील क्रिकेटप्रेमी आणि युवा खेळाडूंना सरावासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्यामुळे स्थानिक क्रिकेटर्सना नवी दिशा मिळणार असल्याचे राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

सदरच्या टर्फ क्रिकेटच्या मैदानावर केदार जाधव यांनी बॅटिंग केल्याने युवा तरुणांनी यादरम्यान उत्साह दाखवला.यावेळी आमदार रवीशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, सभागृहनेते तथा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सीएफआय संस्थेचे अधिकारी डॉ.किशोर देशमुख, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील आदिंसह नगरसेवक, क्रिकेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.