Press "Enter" to skip to content

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत तनिष्का गावंड व भूमी म्हात्रे यांची चमकदार कामगिरी


प्रतिनिधी आवरे (विजय पाटील)

क्रीडा युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा 2026 -2027 सदर जिल्ह्यास्तरीय स्पर्धा ही रामशेठ ठाकूर स्कुल उलवे स्कुलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 44 किलो या वजनी गटात तनिष्का आकाश गावंड व 60 किलो या वजनी गटात भूमी आनंद म्हात्रे या दोन विद्यार्थीनीनी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीने चमकदार कामगिरी केली आहे व सदर खेळाडू ची निवड ही विभागीय स्तरावर करण्यात आली आहे.

या उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा व कराटे शिक्षक शुभम ठाकूर सर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर, विश्वस्त श्री वामन ठाकूर सर, विश्वस्त सौ अलका ठाकूर , मॅडम सिंधु ठाकूर मॅडम विश्वस्त प्रसाद ठाकूर सर आदिनाथ ठाकूर सौ रीना ठाकूर मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक केलेले आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेले यश हे आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक जनार्दन ठाकूर सर यांना अर्पण केलेले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.