Press "Enter" to skip to content

जय माताजी महिला भजन मंडळीतर्फे गो-रक्षण संस्थेच्या बांधकामासाठी ५५ हजारांची देणगी


पनवेल, दि.२५ (संजय कदम) : धार्मिक आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या पनवेल मधील जय माताजी महिला भजन मंडळीने श्री पांजरापोळ गो-रक्षण संस्थेच्या बांधकामासाठी ५५ हजार रुपयांची देणगी देत सेवाभावी उपक्रमाला हातभार लावला आहे. महिला भजन मंडळीच्या या योगदानाचे कौतुक होत आहे.

जय माताजी महिला भजन मंडळीच्या वतीने मंजू कलोर, मधु परमार, जसोदा कुमावत, नीमा वैष्णव आणि नीलम वैष्णव यांनी या देणगी उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेच्या बांधकामासाठी ५५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

भजन आणि भक्तीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांनी धार्मिक कार्यासोबतच गो-रक्षणासारख्या सेवाभावी उपक्रमासाठी आर्थिक योगदान दिले आहे. जय माताजी महिला भजन मंडळीचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपणारा ठरला आहे. त्याचबरोबर त्या वर्षभरात अन्नदान, मोफत औषधे वाटप आदी उपक्रम राबवित असतात.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.