Press "Enter" to skip to content

‘ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश ; पनवेल, पळस्पे फाटा आणि रीस येथे ९७ विद्यार्थ्यांचा सहभाग; चार शाळांच्या माध्यमातून जनजागृती

पनवेल, दि.१८ (संजय कदम): रस्ते सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि जबाबदार वाहनवर्तनाबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनतर्फे ‘ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात चार शाळांमधील ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

न्यू पनवेल येथील एचडीएफसी सर्कलवर रोटरी स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन, पळस्पे फाटा येथे बालाजी इंग्लिश स्कूल आणि छत्रपती शिवाजी स्कूल, तर रीस (रसायनी) येथे संजीवनी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फलक, घोषवाक्ये आणि बॅनरच्या माध्यमातून वाहनचालकांना रस्ते सुरक्षेचा संदेश दिला.
हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि रस्त्यावर जबाबदारीने वागणे यामुळे अपघात टाळण्यास मदत होते, हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असून रस्ते सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, याबाबत या अभियानातून जनजागृती करण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. अभियान यशस्वी करण्यासाठी सहभागी शाळा, शिक्षक आणि रोटेरियन यांनी सहकार्य केले, अशी माहिती क्लबचे सचिव रोटेरियन अॅड. हितेश राजपूत यांनी दिली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.