
पनवेल, दि.१८ (संजय कदम): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल शहर शाखेतर्फे आणि संजीवनी नेचर केअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (१८ ऑक्टोबर) लाईन आळी येथील शिवसेना शहर शाखेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संजीवनी नेचर केअर सेंटरचे डॉ. विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात अॅक्युप्रेशर (सुजोक), रिफ्लेक्सोलॉजी आणि चुंबक चिकित्सा यांसारख्या उपचारपद्धतींद्वारे नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आली. पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, मानदुखी, सायटिका, सायनस आणि मायग्रेन यांसारख्या त्रासांबाबत उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी जिल्हाप्रमुख दीपक निकम, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, विभागप्रमुख प्रवीण जाधव, शहर संघटिका उज्वला गावडे, विभाग संघटिका अश्विनी देसाई तसेच शाखाप्रमुख भास्कर पाटील, मयुरेश पाटील, बापू जोशी, भरत परदेशी, संतोष तळेकर, चंद्रकांत शिर्के, किसन राऊंधळ, राकेश टेमघरे, सचिन कदम, अतुल टेमघरे आणि शुभम माळी यांनी सहकार्य केले.
फोटो : शिवसेना आरोग्य शिबीर


Be First to Comment