
कळंबोली, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
कळंबोली, नवी मुंबई
‘क्रांती सम्राट’ वृत्तपत्राच्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘न्यायसखी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कळंबोली, नवी मुंबई येथे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार न्यायसखी महिला व बलात्कार समितीच्या वतीने प्रदान करण्यात आला. पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक , अध्यक्षा ॲड. भूमिका जाधव तसेच संविधान पर्व न्यूज चे संपादक चंद्रकांत जाधव यांनी केले होते.
पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, समाजातील अन्याय, अत्याचार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. समाजातील विविध प्रश्नांना प्रसिद्धी देणे, जनतेचा आवाज बुलंद करणे आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेला बळ देणे, या कार्याचे महत्त्व या पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
दिपालीताई पारसकर यांना मिळालेला हा सन्मान ‘क्रांती सम्राट’ वृत्तपत्रासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.
या पुरस्काराबद्दल दिपालीताई पारसकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



Be First to Comment