Press "Enter" to skip to content

पोलीस अंमलदार सम्राट डाकी यांची ‘कॉप ऑफ द मंथ’ म्हणून निवडसप्टेंबर महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून गौरव


पनवेल, दि.१६ (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार सम्राट डाकी यांची सप्टेंबर २०२६ महिन्यासाठी ‘कॉप ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हे प्रशंसापत्र देण्यात आले.

पनवेल शहर पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांच्या तपासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी सम्राट डाकी यांनी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी प्रशंसापत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

भविष्यातही त्यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छा सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिल्या. नवी मुंबई पोलीस ठाण्यातर्गत विविध पोलीस ठाण्यात त्या-त्या महिन्यात उत्कृष्ट कामगिरी वाजविणाऱ्या पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक करून त्याचा फोटो पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात लावण्यात येतो त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य उंचावले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.