
पनवेल, दि.१६ (वार्ताहर) : तरुणांना तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी यशवंत मेमोरियल ट्रस्ट, पनवेल यांच्या वतीने शासनमान्य रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग, लॅपटॉप रिपेअरिंग, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन व आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती, ऑटो सर्व्हिस टेक्निशियन आणि असिस्टंट इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
१८ ते ३० वयोगटातील आणि दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असलेल्या तरुणांना या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेता येणार आहे. प्रशिक्षणामध्ये उद्योगाभिमुख कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, औद्योगिक भेटी आणि नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्लेसमेंट सहाय्य दिले जाणार आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी यशवंत मेमोरियल ट्रस्ट, पनवेल येथे संपर्क साधावा. संपर्क : ९८१९२४८७७१ / ९८१९५४०४४८

ओज


Be First to Comment