Press "Enter" to skip to content

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई !


मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील

हिमालयातील प्रतिकूल वातावरणावर मात करत डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका डॉ . सुनीता पाटील यांनी माऊंटेनिअर्स असोसिएशनच्या प्रशिक्षकांच्या साथीने ५ हजार ३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई यशस्वी केली.

हिमालयातील प्रतिकूल वातावरणावर मात करत डोंबिवलीतील नगरसेविका डॉ . सुनीता पाटील यांनी माऊंटेनिअर्स असोसिएशनच्या प्रशिक्षकांच्या साथीने ५ हजार ३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई यशस्वी केली. माऊंटेनिअर्स असोसिएशनची ही तिसरी मोहीम होती. २४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत केलेल्या या मोहिमेत एव्हरेस्ट बेस कॅम्प चढाईचा समावेश होता.

असोसिएशनचे कुशल आणि अनुभवी प्रशिक्षक सतिश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चढाई मोहिमेतील सदस्यांना हिमालयातील सततचे बदलणारे वातावरण, तेथे गेल्यानंतरची जीवनशैली, सततचा हिमवर्षाव, त्यावेळी घ्यावयाची काळजी, सुरक्षा साधनांचा वापर याविषयी प्रशिक्षण सुरू होते.

डोंबिवलीतील नगरसेविका डॉ. सुनिता पाटील आपला वैद्यकीय व्यवसायाबरोबरच नगरसेविका पद भूषवत असल्यामुळे सामाजिक, प्रभागातील नागरिकांची नागरी समस्या, विकास कामांकडे लक्ष देत, महापालिकेच्या सभा, बैठकांमधून वेळ काढत या हिमालय मोहीम प्रशिक्षण उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या मोहिमेत त्यांच्यासह देवदत्त दिगवडेकर, प्रतिक दिगवडेकर, मनीष खरात, ज्योती जोशी, माया दिगवडेकर, अभिजीत कुलकर्णी, राम गणपती, विश्वास जोशी, कैवल्य मोडक, सदानंद दांडेकर, पद्माकर गायकवाड सहभागी झाले होते.

या सर्व गिर्यारोहकांनी यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी केली. या सभासदांनी यापूर्वी हिमालयात अनेक शिखर चढाई मोहिमा यशस्वी केल्या आहेत. चादर ट्रेक, मरका व्हॅली, सतोपंथ ट्रेक, तपोवन ट्रेक, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असे अनेक ट्रेक या सदस्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे
अशाप्रकारच्या मोहिमा आयोजित करून नागरिकांना पर्यावरण संवर्धन किती महत्वाचे आहे. निसर्गाची आपण काळजी घेतली तर नंदनवनातील वातावरणासारखा ठेऊ शकतो. आपण निसर्गाची काळजी घेतली नाहीतर मग कशा आणि कोणत्या धोक्यांना आपणास सामोरे जाऊ शकते. हे सर्व अनुभव नागरिकांना मिळावेत या उद्देशातून या मोहिमा आयोजित केल्या जाता, असे माऊंटेनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश गायकवाड, सचिव दिलीप भगत यांनी सांगितले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.