

रसायनी — राकेश खराडे
आशा विजय कोकणे- वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व जन शिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र च्या प्रशिक्षिका यांचा नुकताच दिल्ली येथे “युरो एशियन विद्यापीठ” -द्वारा “आंतरराष्ट्रीय दिक्षांत सोहळा” पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी” “विविध विषयांवर 1500 पेक्षाही अधिक वारली चित्र निर्मितीतून “महाराष्ट्र व भारत देशाची प्राचीन हस्तकला संस्कृती लेखन व संशोधनासाठी मानद डॉक्टरेट देऊन सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान” करण्यात आला पण ह्या आशा कोकणे आहेत तरी कोण?? व त्यांचे कार्य काय?? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल
अर्थशास्त्रात विषयात उच्च पदवीधर असणाऱ्या व हाडाच्या शिक्षिका, प्रशिक्षिका डॉ आशा विजय कोकणे या थोर सामाजिक कार्यकर्ते व बिझनेस मॅनेजमेंटचे गुरु हिरामण कोकणे व मार्गदर्शक सल्लागार सुमन कोकणे यांच्या त्या सुनबाई असून भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड चे संचालक डॉ विजय कोकणे यांच्या त्या पत्नी आहेत संस्थापक अध्यक्ष म्हणून वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आशा कोकणे या गरीब-गरजू विद्यार्थ्यांकरिता बाल संस्कार वर्ग, स्वल्पदरात शिक्षण-प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे कार्य असून अनेक समाज उपयोगी उपक्रम त्या संस्थेच्या माध्यमातून राबवित आहेत , त्या एक निष्णात वारली चित्रकार असून भारतात व भारताबाहेरी अनेक देशांमधून त्यांच्या वारली चित्रकलेला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे 1500 पेक्षाही जास्त वारली चित्रकलेच्या डिझाईन्स त्याही वेगवेगळ्या प्रकारच्या नॅचरल बेसेस वरती त्यांनी निर्मित केलेल्या असून भारताची अति प्राचीन संस्कृती वारली चित्रकलेच्या माध्यमातून देश विदेशात पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ नितीन गांधी प्रकाशित व आशा विजय कोकणे निर्मित “वारली चित्रकलेवर आधारित संशोधन पुस्तिके च्या व वारली चित्रकलेच्या माध्यमातून त्या करीत आहेत व सदर संशोधन पुस्तिकेचे विशेष कौतुक देखील विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेश भविष्यात त्यांची वारली चित्रकला “ॲमेझॉन सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती देखील विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे”

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशियारी, रमेश बैस जी, रामभाऊ नाईक व लोकसभा स्पीकर पद्मविभूषण सुमित्रा ताई महाजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधानजी, डॉ किरीट सोमैया, डॉ मेधा सोमैया ,डॉ नितीन गांधी,यांच्या समवेत अनेक कंपन्यांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व देश-विदेशातील सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या माध्यमातून त्यांच्या द्वारे निर्मित वारली चित्रकलेतील कार्याचे व कलाकृतीचे विशेष कौतुक करण्यात आलेले आहे यापूर्वी देखील डॉ आशा विजय कोकणे यांना शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार -2025 प्राप्त आहे खऱ्या अर्थाने नवयुगाच्या त्या नवदुर्गा आहेत असेच म्हणायला हवे.
भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड च्या माध्यमातून प्रशिक्षिका म्हणून अलिबाग तुरुंगामध्ये वारली चित्रकला व शोभिवंत फुले बनवणे इत्यादीचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण त्यांनी कैद्यांना दिलेले असून पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई चे अध्यक्ष डॉ किरीट सोमैया, जन शिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉ मेधा सोमैया*, अध्यक्ष डॉ नितीन गांधी, उपाध्यक्ष रत्नप्रभा बेलेकर, सामाजिक कार्यकर्ते नरेन जाधव,ॲड.नीला तुळपुळे, गीतांजली ओक, यांच्या माध्यमातून वारंवार त्यांच्या कार्याचा गौरव व प्रेरणा त्यांना कायमच मिळाली आहे.
दिल्ली येथे सदर मानद डॉक्टरेट पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन होत आहे.
जिद्दीच्या जोरावर ती चौफेर यशस्वी भरारी घेणाऱ्या अथक परिश्रमातून भारतीय कला संस्कृतीचा प्रचार प्रसार करणाऱ्या व बालकांमध्ये चांगल्या सुसंस्कृत गुणांची रुजवणूक करणाऱ्या या नवदुर्गेला नवरात्री सणामध्ये मानाचा मुजरा..





Be First to Comment