Press "Enter" to skip to content

मोदी-शहांच्या सत्तेला युवा पिढी सुरुंग लावणार! भाजपचा पायउतार निश्चित; अनंत गीतेंचा घणाघात

पनवेलच्या पाणीटंचाईवरून बबनदादा पाटील आक्रमक; दसऱ्यानंतर महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा


कामोठ्यात ठाकरे गटाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, सचिन गायकवाड यांच्यासह शेकडो नागरिकांचा पक्षप्रवेश

पनवेल, दि.१२ (वार्ताहर) : देशातील राजकीय चित्र झपाट्याने बदलत असून, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सत्तेला युवा पिढी सुरुंग लावणार आहे. भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल, असा घणाघाती दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला. कामोठे येथे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन झाले.

पाणीटंचाईवरून महापालिकेला धारेवर
एकीकडे राजकीय सत्तांतराचे दावे होत असताना, दुसरीकडे पनवेलकरांना ऑक्टोबर महिन्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेच्या कारभारावर टीका करत त्यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीसमस्येचा जाब प्रशासनाला विचारणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रश्नाकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी दसऱ्यानंतर महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गोपीनाथ भगत, सचिन गायकवाड यांचा पक्षप्रवेश
या कार्यक्रमातील महत्त्वाची बाब म्हणजे माजी नगरसेवक तथा प्रभाग समिती ‘क’चे माजी सभापती गोपीनाथ भगत आणि जय महाकाली देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह शेकडो नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कामोठे परिसरातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख तथा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख समाधान काशीद, नगरसेविका मेघना घाडगे, रितिक्षा गोवारी, प्रिया गोवारी, विभागप्रमुख रामदास गवारी, प्रवीण जाधव, विश्वास पेटकर, सुनील गोवारी, कामोठे शहर संघटिका संगीता राऊत, सुवर्णा वाळुंज, धनश्री राठोड, कामगार नेते अविनाश मोरे आणि शिवसेना आरोग्य सेनेचे पदाधिकारी डॉ. आशिष बांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनंत गीते यांचा भाजपविरोधातील आक्रमक राजकीय दावा, बबनदादा पाटील यांनी पाणीटंचाईवरून दिलेला मोर्चाचा इशारा आणि शेकडो नागरिकांचा पक्षप्रवेश यामुळे कामोठ्यातील या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.