
जळगाव (आनंद पवार)महर्षी वेदव्यास यांच्या दिव्य प्रतिभेतून साकारलेल्या पुराणांमध्ये धर्मतत्त्वज्ञान,पदार्थविज्ञान,खगोलशास्त्र ,राजनीती,समाजरचना कर्तव्य-अकर्तव्य,कर्माचा अटळ सिद्धांत तसेच पाप-पुण्य अशा विविध विषयांचा सखोल परामर्श घेण्यात आला आहे. या प्राचीन ज्ञान परंपरेतून मानवी जीवनाला दिशा देणारे विचार आणि आध्यात्मिक मूल्यांचा अमूल्य ठेवा समाजाला लाभला आहे.
शक्ती उपासना ही सर्वत्र,सर्वकाळी आणि विविध धर्म-संप्रदायांमध्ये महत्त्वपूर्ण मानली गेली आहे.शक्तीचे अपार महत्त्व समर्थ रामदास स्वामी,संत एकनाथ महाराज यांच्यासह अनेक संतांनी आपल्या विचारांतून अधोरेखित केले आहे.ज्या ठिकाणी शक्तीचा संचार असतो,त्या ठिकाणी उत्साह,चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.अशा वातावरणात यश, समृद्धी आणि जीवनाला उन्नतीच्या दिशेने नेणाऱ्या सद्गुणांचा विकास होतो,हा विचार शक्ती उपासनेतून अधोरेखित केला जातो.
याच आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेचा जागर करण्यासाठी रविवार दि.११ ऑक्टोंबर ते१९ऑक्टोबर रोजी कथा वाचन वेळ रात्री ८:३० ते१० वाजे पर्यंत जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील विठ्ठल मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त विशेष कार्यक्रमाचा प्रारंभ झाला असुन या कार्यक्रमात भूपेंद्र कुलकर्णी हे प्रभावी व ओघवत्या शैलीत धार्मिक तत्त्वज्ञान,शक्ती उपासनेचे महत्त्व आणि नवरात्रोत्सवामागील आध्यात्मिक विचार उपस्थितांसमोर मांडत आहेत.शक्तीची उपासना म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे,तर मनातील आत्मविश्वास जागृत करून सद्विचार,सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाने जीवन जगण्याची प्रेरणा होय.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अशा विचारांचे श्रवण आणि चिंतन करण्याची संधी बहादरपूर येथील भाविकांना मिळत आहे.



Be First to Comment