
“‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा विशेष पुढाकार; नवरात्रीनिमित्त महिलांच्या आरोग्याला प्राधान्य!”
पनवेल, दि. ११ ऑक्टोबर २०२६ : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सेवाभावी विचारांना अनुसरून भारतीय जनता पार्टीच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत नवरात्रीनिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, पनवेल व दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १९ ऑक्टोबर २०२६ या नऊ दिवसांच्या कालावधीत महिलांसाठी मोफत थायरॉईड (TSH) तपासणी करण्यात येणार आहे.
संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. जे. एम. म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या पुढाकारातून हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांच्या नियोजनात या उपक्रमाला दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभतो.
महिलांमध्ये थायरॉईडसंबंधी आजारांविषयी जनजागृती करणे, वेळेत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. वजनातील चढ-उतार, सतत थकवा जाणवणे, केस गळणे, मासिक पाळीतील अनियमितता यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आवश्यक आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिराचे ठिकाण व वेळ :
📅 ११ ते १९ ऑक्टोबर २०२६
⏰ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
📍 आरोग्य सेवालय, दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी, शॉप नं. ४, वास्तु श्री सी.एच.एस., प्लॉट नं. ५०/६, महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयासमोर, पनवेल – ४१०२०६.
भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांची प्रतिक्रिया
— श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे
“देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सेवाभावी विचारांना अनुसरून भारतीय जनता पार्टीच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांचे आरोग्य हा निरोगी कुटुंबाचा पाया आहे. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहोत. नवरात्रीनिमित्त महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी आयोजित केली असून, जास्तीत जास्त भगिनींनी याचा लाभ घ्यावा. निरोगी महिला, सक्षम कुटुंब आणि सशक्त समाज हाच आमचा सेवासंकल्प आहे!”
अध्यक्ष,
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, पनवेल.
नवरात्री निमित्त आयोजित या उपक्रमाचा पनवेल परिसरातील जास्तीत जास्त भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Be First to Comment