
पनवेल, दि.९ (वार्ताहर) : प्रभाग क्रमांक १४ मध्ये ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांच्या नगरसेवक निधीतून किनारा सोसायटीला नऊ डस्टबीनचे वाटप करण्यात आले.
परिसरातील स्वच्छता राखणे आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. डस्टबीनमुळे सोसायटी परिसरात कचरा संकलन आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या वेळी नगरसेवक लतीफ शेख, नगरसेवक केतन म्हात्रे, नगरसेविका मनीषा म्हात्रे, विभागप्रमुख प्रवीण जाधव, काँग्रेस नेत्या निर्मला म्हात्रे, सोसायटीचे सचिव पंकज रूपारेल, बकुळ पांड्या, आरती ठाकूर, नीता शिनॉय, पंकज शिनॉय आणि शाखाप्रमुख आदिल आवसेकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.



Be First to Comment