

खारघर : भारतीय जनता पार्टी प्रणित मधु पाटील प्रतिष्ठान आणि प्रविण पाटील वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये यंदा खारघरची आई – नमो गरबा २०२६ या भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत JHBC ग्राउंड, खारघर – DMart समोर, खारघर मेट्रो स्टेशनच्या बाजूला हा उत्सव रंगणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, संस्कृती, संगीत आणि गरब्याचा उत्साह एकाच ठिकाणी अनुभवता यावा, यासाठी यंदा विशेष नियोजन करण्यात आले आहे. खारघर आणि परिसरातील नागरिकांसाठी हा उत्सव आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
९ ऑक्टोबरला भव्य आगमन सोहळा (खारघरची आई नवरात्रौत्सव)
‘खारघरची आई’च्या उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आगमन सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे ‘एकविरा म्युझिकल ग्रुप – मी बेलापूरकर’ आणि ‘श्री दैवत ढोल-ताशा व ध्वजपथक’ यांचे दमदार सादरीकरण.
पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय संगीताच्या जल्लोषात खारघरच्या आईचे आगमन होणार असून, या सोहळ्यामुळे नवरात्रौत्सवाच्या उत्साहाला आणखी उधाण येणार आहे. या भव्य आगमन सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

गरब्याचे खास आकर्षण – Sangeet Samrat आणि ‘Me Honar Superstar’ फेम श्रावणी महाजन आणि विशेष बँड
यंदाच्या नमो गरबा २०२६चे विशेष आकर्षण म्हणजे ‘Me Honar Superstar’ फेम श्रावणी महाजन यांच्या दमदार सादरीकरणासोबतच विशेष लाईव्ह बँडची उपस्थिती. पारंपरिक गरब्याच्या तालासोबत आधुनिक संगीताची रंगत अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
गरबा, संगीत आणि उत्साहाने भरलेल्या या संध्याकाळी खारघरकरांसह नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी आयोजकांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.
उत्सवाच्या पहिल्याच वर्षी भव्य आयोजन
‘खारघरची आई नवरात्रौत्सवाचे हे पहिलेच वर्ष असून, पहिल्याच वर्षी मोठ्या स्वरूपात नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखत नागरिकांना कुटुंबासह आनंद घेता यावा, यासाठी उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
नवरात्रौत्सवाच्या काळात परिसरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण व्हावे, तसेच महिला, युवक, कुटुंबे आणि गरबा रसिकांना एकत्र येऊन उत्सव साजरा करता यावा, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
BookMyShow वर तिकीट उपलब्ध
‘नमो गरबा २०२६’साठीची तिकिटे BookMyShow वर उपलब्ध असून, गरबा रसिकांनी वेळेत आपली तिकिटे बुक करावीत, असे आयोजकांनी सांगितले आहे.
खारघर आणि नवी मुंबईतील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह, मित्रपरिवारासह या भव्य नवरात्रोत्सवात सहभागी व्हावे आणि ‘खारघरची आई – नमो गरबा २०२६’चा उत्साह अनुभवावा, असे आवाहन मधु पाटील प्रतिष्ठान आणि प्रविण पाटील वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवरात्रीच्या भक्तीचा रंग… गरब्याचा ताल… आणि उत्सवाचा जल्लोष अनुभवण्यासाठी खारघरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!‘खारघरची आई – नमो गरबा २०२६’मध्ये आपली उपस्थिती नक्की नोंदवा!
कार्यक्रमाची प्रमुख माहिती
कार्यक्रम : खारघरची आई – नमो गरबा २०२६
आयोजक : भारतीय जनता पार्टी प्रणित मधु पाटील प्रतिष्ठान व प्रविण पाटील वेल्फेअर असोसिएशन
नवरात्रोत्सव : ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६
स्थळ : JHBC Ground, खारघर – DMart समोर, खारघर गाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला
भव्य आगमन सोहळा : ९ ऑक्टोबर २०२६, सायंकाळी ६ वाजता
विशेष आकर्षण : Sangeet सम्राट आणि ‘Me Honar Superstar’ फेम श्रावणी महाजन आणि विशेष लाईव्ह बँड
तिकीट : BookMyShow वर उपलब्ध
आयोजक
श्री. प्रवीण पाटील मा. स्थायी समिती सभापती नगरसेवक, पनवेल,श्री. मधु पाटील सभापती, प्रभाग समिती ‘ब’ नगरसेवकः पनवेल



Be First to Comment