
पनवेल : सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आयोजित नारीशक्ती संमेलन नुकतेच शिर्डी येथे पार पडले. संमेलनाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर , राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताराम चाळके ,महामंत्री विवेक जुगादे,महिला प्रमुख वैशाली आव्हाड यांच्या हस्ते पार पडले .यावेळी बोलताना महिलांचा सहकारातील सहभाग हा पर्याय नव्हे तर भक्कम आधार बनायला हवा असं मत जलसंपदा मंत्री ना .राधाकृष्ण विखे पाटील यांनी नारीशक्ती संमेलनामध्ये व्यक्त केले. तर मेघनाताई बोर्डीकर यांनी सहकारातून समृद्धी शक्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश महिला प्रमुख वैशालीताई आवाडे यांनी केले. सहकारातील महिलांना त्यांची ताकद आणि शक्ती याची जाणीव करून देण्यासाठी संमेलनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. महामंत्री विवेक जुगादे यांनी संस्कारीत सहकार महत्त्वाचा असल्याचे सांगितले.यावेळी नारीशक्ती सहकार दर्पण या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी संस्कृत मधून अनेक दाखले देत उत्तम वक्तृत्वाने उपस्थित महिलांमधील शक्ती जागृत करण्याचे कार्य केलं. कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्ले यांनीही महिला शक्तीला मार्गदर्शन केले. कोपरगाव मतदार संघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,जीएस महानगर च्या अध्यक्षा गीतांजली शेळके ,संस्थेच्या मीनाक्षी निकम आणि महाराष्ट्र राज्य मच्छीमार फेडरेशनच्या अध्यक्षा ज्योती मेहेर यांच्याशी प्रदेश महिला प्रमुख वैशाली आवाडे आणि अपर्णां नाडगौंडी यांनी संवाद साधला. सहकार क्षेत्रात काम करताना करताना येणाऱ्या अडचणी, असलेल्या संधी, त्यांनी उभे केलेले काम, सहकारातील संधी युवा घटकाचा सहभाग या सर्वच विषयांवर नेमकी आणि उद्बोधक अशी चर्चा या मंचावर झाली. सामाजिक कार्यकर्त्या शोभना भिडे यांनी मातृत्व ,नेतृत्व आणि कर्तृत्व या विषयाच्या अनुषंगाने सहकार क्षेत्रात महिला कशा उत्तम कार्य करू शकतात याबाबत मार्गदर्शन केले .

महिला विकास मंडळाच्या वतीने तसेच उमेद अधिकारी श्री बोराडे यांनी पीपीटी च्या माध्यमातून शासकीय योजनांची नेमकी माहिती दिली. डोंबिवली नागरी बँकेचे संचालक योगेश वाळुंजकर यांनी सायबर सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. सहकार भारती राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी सहकारभान यायला हवे असे उपस्थित महिलांना सांगितले. प्रामाणिकता महत्त्वाची असून येणाऱ्या दिवसांमध्ये संवेदनशील तत्व बाळगले तर सहकार क्षेत्र राष्ट्र विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल असे पाचपोर यांनी सांगितले . राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांनी नारी शक्ती विश्व कल्याणामध्ये महत्त्वाची भूमिका निघाले आणि त्यामध्ये सहकार क्षेत्र हे आघाडीवर असेल तर त्यासाठी संस्कार व्यावसायिक दृष्टिकोन आणि देशात प्रेम या भावना महत्त्वाच्या आहेत असे सांगितले.
दोन दिवसांच्या नारीशक्ती संमेलनामध्ये सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या पतसंस्थांच्या संचालक बँकांच्या संचालक बचत गट प्रतिनिधी मच्छिमार संस्था ग्राम सखी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या .सहकार क्षेत्र समजून घेताना कार्य करण्याची नेमकी दिशा या संमेलनातून स्पष्ट झाली.
संमेलनातील विविध सत्रांमुळे उपस्थित महिला ऊर्जा तर मिळाली याशिवाय प्रचंड माहितीचा खजिना ही मिळाला.
पनवेल मधूनही या संमेलनासाठी सहकार भारती पनवेल महानगर महिला प्रमुख अपर्णा नाडगौंडी यांच्या नेतृत्वाखाली नारीशक्ती दाखल झाली. पंधरा बचत गट प्रतिनिधी, तुळजाभवानी पतसंस्थेच्या संचालिका ,कमळ महिला पतसंस्थेच्या संचालिका यांनी सहभाग नोंदवला.
या संमेलनाचा यशस्वीतेसाठी पनवेल बचत गट प्रकोष्ट प्रमुख स्वप्ना
साखरे, सदस्य स्मिता शेडगे, शैला खाडे, संघटन प्रमुख संतोष पोकळे, महानगरपालिका दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या व्यवस्थापक विनया म्हात्रे कीर्तनकार सुनिता खरे यांचे सहकार्य लाभले.



Be First to Comment