
आवरे प्रतिनिधी (सचिन पाटील) राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची (157 वी ) देशाचे दुसरे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ( 122वी) जयंती हि जे .जे ठाकूर स्कूल आवरे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात दोन्ही नेत्यांचे योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण समजले जाते. अखंड आयुष्यात अहिंसा परमोधर्म या तत्वाने चालणारे महात्मा गांधीजी हे स्वातंत्र्यापूर्वी देशावर आलेले ब्रिटिशांचे जुलमी संकट दूर करण्यासाठी विविध चळवली उभारून ब्रिटिशाना परतावून लावण्याचा धाडसी प्रयत्न केला तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन शेतकरी व सैनिक यांचे मनोबल वाढवले.

या थोर अश्या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्मृतिस विनम्र अभिवादन केले तसेच विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृती सर्वांनी अभिवादन केले.
अशोक ठाकूर हे गांधीजींना आपला आदर्श मानत असत. सदर अभिवादना नंतर विद्यालयातील (31) विद्यार्थ्यांनी गांधीजींची वेशभूषा केली होती व एक विद्यार्थीनीनी कस्तुरभा गांधी यांची वेशभूषा केली होती. सदर कार्यक्रम नंतर विद्यार्थ्यांची रॅली ही आवरे गावात काढण्यात आली. रॅलीमध्ये “रघुपति राघव राजाराम पतित पवन सिताराम” “जय जवान जय किसान” अशा विद्यार्थ्यांनी घोषणाचा नाद दुमदुमून गेला .
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांची रॅली पाहून सर्व नागरिकांनी स्वातंत्र्य पूर्व इतिहासातील काळ आठवला. या अनुषंगाने राष्ट्र पुरुषांची आठवण ही सर्वांना झाली अशा प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे उपस्थिती दर्शवली


Be First to Comment