पनवेल/ प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भीय शासन निर्णयान्वये दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर या महिन्याभराच्या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. दिनांक २८ सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियान अंतर्गत केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा तळोजे पाचनंद येथे संपन्न झाले.या स्पर्धेत तीन गटातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला इयत्ता तिसरी ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते बारावी अशा तिन्ही गटातून १३ शाळांनी सहभाग नोंदविला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख भागवत पवार तसेच तळोजा पाचनंद शाळेचे मुख्याध्यापक शंकर ठाकूर उपस्थित होते परीक्षक म्हणून रोहिणी काबाडी, खुटारी शाळा योगिनी वैदू, तळोजे पाचनंद शाळा भाविका घोलप, पापडीचा पाडा शाळा, नितीन स्थळे, शाळा ओवे मराठी व सिंघासने,शाळा तळोजे पाचनंद यांनी भूमिका पार पाडली. या स्पर्धेत
विजयी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे…. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक गट तीन ते पाच मध्ये कुमार आयुष मंगेश म्हात्रे, शाळा गट इयत्ता सहावी ते नऊ मधील साजिद जावेद शेख ओवे पेठ शाळा, गट नववी ते बारावी मध्ये शेख इलमा इस्माईल नॅशनल उर्दू शाळा.
चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक आहेत गट तिसरी ते पाचवी आनंदकुमार जैस्वार, सहावी ते आठवी शेख सुखा अब्दुल व नववी ते बारावी शेख सिफा आरिफ.
विद्यार्थ्यांच्या अंगी विविध गुणवत्तापूर्ण विकासाकरता या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीला हातभार लागला असल्याची प्रतिक्रिया आयोजकांच्या वतीने देण्यात आली.



Be First to Comment