Press "Enter" to skip to content

बुद्धगयेच्या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अधिकचा लढा देणार — डॉ.भीमराव आंबेडकर

पेण, ता. २८ (वार्ताहर) : बौद्ध धर्मीयांचे धार्मिक स्थळ असणाऱ्या बुद्धगयेच्या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू असताना ते विहार आपल्या ताब्यात देण्यात यावे यासाठी आपण लवकरच पंतप्रधानाची भेट घेणार असून मनुवाद्यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ हटवून सदरचे महाविहार मुक्त करावे अन्यथा यासाठी अधिकचा लढा देणार असल्याचे वक्तव्य भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे चीप डॉ.भीमराव आंबेडकर यांनी पेण येथे केले.

भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अंतर्गत शाखा पेण आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून वर्षावास मालिकेच्या १४ व्या पुष्पाचे तसेच समाजरत्न सन्मान पुरस्काराचे आयोजन दि.२७ रोजी शहरातील लोकमान्य हाउसिंग सोसायटी येथील हॉलवर करण्यात आले होते.या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर,
प्रदेश संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे, केंद्रीय सदस्या सुनंदा वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष सोनावळे, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, वंचित बहुजन आघाडी पेण तालुकाध्यक्ष सुनील प्रल्हाद धामणकर, महिला जिल्हाध्यक्ष उषा कांबळे आदिंसह महिला, बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी ते अधिक म्हणाले सध्याच्या युगात संस्कृतीचा ऱ्हास होत चालला असताना आपली संस्कृती राखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन आपण केले पाहिजे सध्या उपवर्गीकरणासह जनगणनेच्या विषयात देखील समाजाने दक्ष राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी आनंद सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया धामणकर यांनी स्वहाताने काढलेली कापडावरील रांगोळी भेट दिली.तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्यांना समाजरत्न सन्मान पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.

बौद्ध महासभेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेण तालुक्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेचा प्रत्येक सदस्य करत आलो असून आपण येथे येतअसल्याने हिच ऊर्जा आमच्या सारख्या कार्यकर्त्याला मिळत असल्याने येत्या काही दिवसांतच पेण मध्ये एका मोठ्या धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
चंद्रकांत सोनवणे- अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा

वर्षावास मध्ये सगळीकडे धम्म प्रवचन होत असताना आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे
विचार अंगीकृत करता येतात आणि हेच विचार समाजाला प्रगतीपथावर घेऊन जात आहेत त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम करूया असे त्यांनीसांगितले.*
सुनील धामणकर- अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.