Press "Enter" to skip to content

११२ कारखान्यांना होणार फायदा

जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटला अखंड वीजपुरवठ्याची जोडऔद्योगिक एक्सप्रेस फिडरच्या कामाचे भूमीपूजन


पनवेल, दि.२८ (वार्ताहर) : जवाहर को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटमधील उद्योगांना अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी औद्योगिक एक्सप्रेस फिडरच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या फिडरमुळे येथील सुमारे ११२ कारखान्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होऊन उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

कामोठे येथील जवाहर को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेडच्या सोसायटी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, महापौर नितीन पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटये, उपायुक्त उद्योग व सेवा जी. एस. हरळया, महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, जवाहर को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष स्वप्नील प्रदीप गुप्ते, कार्याध्यक्ष केतन नाईक, उपाध्यक्ष आशिष बलदोटा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रशांत ठाकूर म्हणाले की, जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सुमारे ११२ कारखाने कार्यरत आहेत. भूमिगत पद्धतीने अखंड वीजपुरवठा उपलब्ध झाल्याने कारखानदारांना मोठा फायदा होणार असून उत्पादन प्रक्रियेत येणारे वीजपुरवठ्याशी संबंधित अडथळे कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे परिसरातील उद्योगवाढीलाही चालना मिळेल.

या प्रकल्पासाठी दिवंगत प्रदीप गुप्ते यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले होते. त्यानंतर विद्यमान अध्यक्ष स्वप्नील गुप्ते यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून प्रकल्पासाठी १०० टक्के शासकीय निधी उपलब्ध झाला असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

आमदार विक्रांत पाटील यांनी स्वप्नील गुप्ते यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत शासनस्तरावरील अडचणी दूर करून प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात यश आल्याचे सांगितले. या सुविधेचा येथील उद्योजकांना निश्चितच फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी रायगड जिल्हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असून उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

अध्यक्ष स्वप्नील गुप्ते यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधा पनवेल महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली.
कार्यक्रमास उद्योजक विजय लोखंडे, नगरसेवक विकास घरत, प्रदीप घरत, कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख, गुन्हे शाखा कक्ष-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्यासह संचालक मंडळातील गिरीश देशपांडे, बी. पी. तेरडे, उदित सं. कपूर, सिद्धेश ना. सावंत, तरुण सु. आहुजा, रोहिणी डॉगरे, नंदन सुदाम पाटीलहंडे, नेहा वि. शर्मा, प्रदीप शाह, रोजी म. कपूर, सरकारी प्रतिनिधी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल, व्यवस्थापक आर. एस. निकम तसेच सरकारी प्रतिनिधी तथा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, अलिबाग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गाडगीळ यांनी केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.