
पनवेल, दि.२१ (वार्ताहर) : केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेश सजावट व मूर्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घरगुती गणेश सजावटीच्या माध्यमातून कला, संस्कृती, भक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक दिलीप नामदेव पाटील, द्वितीय क्रमांक साहिल दत्ता मुकादम, तर तृतीय क्रमांक दर्शन सुजित थोरात यांनी पटकावला. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींसाठी पाच विशेष पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेतील सर्व विजेते आणि सहभागींचे केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचे संस्थापक मोहनिश अनंत भोईर आणि ॲड. डॉ. कोमल मोहनिश भोईर यांनी हार्दिक अभिनंदन केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कलात्मकता, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सहभागी व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.




Be First to Comment