
मुंबई : पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी सातत्याने कार्य करणारी कंपनी म्हणून Re Sustainability Limited ची ओळख आहे. याच पर्यावरणपूरक कार्याचा एक भाग म्हणून कंपनीतर्फे यंदा “पर्यावरणपूरक ग्रीन गणेशोत्सव – २०२६” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ५,००० पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींचे मोफत वितरण करण्यात येत आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा उत्सव श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करत असताना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हीदेखील काळाची गरज आहे. याच उद्देशाने Re Sustainability Limited ने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत कंपनीचे कर्मचारी, सोसायटीतील सभासद, शासकीय अधिकारी तसेच समाजातील विविध घटकांना पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींचे मोफत वितरण करण्यात येत आहे.



सामान्यतः प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) पासून तयार केलेल्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत. तसेच काही मूर्तींवर वापरले जाणारे रासायनिक रंग जलप्रदूषणास कारणीभूत ठरू शकतात आणि त्याचा जलचर सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
याउलट, या उपक्रमांतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती नैसर्गिक माती, कोकोपीट, बियाणे आणि कंपोस्ट यांसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार करण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनानंतर या मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याऐवजी घरच्या घरी एका कुंडीत मातीमध्ये करता येते. कालांतराने मूर्ती नैसर्गिकरित्या मातीत मिसळते आणि त्यातील बियाण्यांपासून नवीन रोपाची निर्मिती होऊ शकते.
अशाप्रकारे ‘गणपती बाप्पा मोरया’सोबत निसर्ग संवर्धनाचा संदेश देत, बाप्पांचे निसर्गाकडे पुनरागमन आणि त्यातून नवीन जीवनाची निर्मिती करण्याचा सुंदर उपक्रम या माध्यमातून साकारला जात आहे.
Re Sustainability Limited च्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलप्रदूषण टाळणे, पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे हा आहे.
कंपनीच्या वतीने नागरिकांना यंदाचा गणेशोत्सव श्रद्धा, भक्ती आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी या भावनेने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला सोमनाथ मलगर संचालक यांचं नेतृत्व लाभले तसेच संदीप महाजन हेड एच आर, रामदास गोलार सेफ्टी तसेच सतेज दिवस सीएसआर यांचे मोलाचे सहकार्य लाभले..



Be First to Comment