




प्रतिनिधी आवरे (शंकर पाटील)
श्रावण महिना हा हिंदू काल गंणनेनुसार पाचवा महिना आणि पवित्र महिना असा मानला जातो. या महिन्यामध्ये निसर्ग खरंच बहरलेला असतो. पावसाची रिमझिम हे चालूच असते आणि ऊन पावसाचा खेळ चालू असतो. ह्या महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना करतात. या महिन्यात येणारे सण आहेत ते नागपंचमी, पोळा, रक्षाबंधन गोकुळाष्टमी ,पिठोरी अमावस्या आणि ह्या महिन्याचं विशेष म्हणजे मुलं आणि मुले पारंपरिक नृत्य गायन करत असतात. वातावरणात एक कमालीचे चैतन्य निर्माण होत असते आणि प्रत्येक जण जो आहे तो सात्विक आहार घेत असतो.
सरत्या श्रावण महिन्याला निरोप देण्यासाठी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मध्ये श्रावण महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी आपली लोक नृत्य, गायन विविध असे सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कौशल्य जे आहे. त्याची प्रचिती दिली तसेच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित ऑलम्पियाड या स्पर्धा परीक्षेत मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ह्या कार्यक्रमा धुरा आठवीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक ठाकूर सर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधी मिलिंद म्हात्रे रुचिता पाटील अश्विनी पाटील सुष्मिता गावंड असे मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आयोजित केला होता. त्याला विद्यार्थ्यांनी मोलाची साथ दिली.



Be First to Comment