Press "Enter" to skip to content

पनवेल स्टेशन रोडवरील गटार व रस्त्याचे काम तातडीने करण्याची नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांची मागणी


साईबाबा मंदिर ते हॉटेल आर्या तसेच संत सावता माळी हॉल ते मुख्य काँक्रिटी रस्त्यापर्यंत विकासकामांसाठी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांचा पाठपुरावा

पनवेल, दि.१० (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका हद्दीतील स्टेशन रोड परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ते व पावसाळी गटारांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नगरसेवक ॲड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी केली आहे.

महापालिकेच्या यादीतील पनवेल येथील साईबाबा मंदिर ते हॉटेल आर्या, स्टेशन रोड तसेच संत सावता माळी हॉल ते मुख्य काँक्रिटी रस्ता या मार्गावरील दोन्ही बाजूंचे जुने पावसाळी गटार तोडून त्याठिकाणी नव्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने गटार व फुटपाथ बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित मार्गावरील रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही ॲड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. पावसाळ्यात गटारे तुंबणे, पाणी साचणे तसेच खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गटार, फुटपाथ आणि रस्त्याचे काम एकाचवेळी हाती घेऊन परिसरातील समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.