

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा. नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी “बुके नको तर बुक द्या” ही सामाजिक बांधिलकी जपणारी संकल्पना राबविण्यात येते. यावर्षीही या उपक्रमाला नागरिक, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमातून तब्बल ८ हजार वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी, ड्रॉईंग बुक, पॅड तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाढदिवसाच्या भेटीच्या स्वरूपात जमा झाले.
जमा झालेले हे शैक्षणिक साहित्य खारघर येथील चापेवाडी व फणसवाडी येथील आदिवासी शाळा, धामोळे गावातील आदिवासी शाळा तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.



हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांनी महापौर साहेबांचे मानलेले मनःपूर्वक आभार, हीच या उपक्रमाची खरी कमाई आहे. याशिवाय उर्वरित शालेय साहित्य गरजू विद्यार्थी तसेच इतर आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये मिळालेली भेट एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी उपयोगी पडावी, त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्याच्या भविष्याला ज्ञानाची नवी दिशा मिळावी, यापेक्षा मोठी भेट कोणती असू शकते!
या उपक्रमावेळी माजी नगरसेवक प्रदीप सावंत, सुधीर देसाई,राजा चव्हाण, सचिन नाझरे,नरेंद्र सोनावणे,शाळेचे शिक्षक,पनवेल महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी जितेंद्र मढवी तसेच जाणीव एक सामाजिक संस्था, अभिनव युवक मित्र मंडळ, अभिनव स्वरागर्जना ढोल-ताशा पथक, नादस्फुर्ती ढोल-ताशा पथक सामाजिक संस्थां या सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.



Be First to Comment