Press "Enter" to skip to content

खत केंद्रावर ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने शेतकरी हैराण ; खत विक्री ऑफलाईन पद्धतीने करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी

पेण (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील पेण हे भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असल्याने येथे भातशेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे भाताची सुपीकता अधिक वाढावी यासाठी शेतकऱ्यांनी युरिया खत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.मात्र कृषी विभागाची खत विक्री करण्याची ऑनलाईन प्रक्रिया अनेकवेळा बंद येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी खत विक्री ऑफलाईन पद्धतीने करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे.

देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून होणारी खत विक्री पारदर्शकपणे व्हावी आणि सध्याच्या ऑनलाईनच्या स्मार्ट युगात शेतकरी देखील स्मार्ट व्हावा या उद्देशाने शासनाने रायगड जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन खत विक्री सुरू केली आहे.मात्र ही ऑनलाइन खत विक्री करत असताना अनेकदा सर्व्हर डाऊन होत असल्याने या टप्प्यात शेतकऱ्यांनी शेतीची कामे सोडून खत विक्री साठी केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे.पेण तालुक्यातील नैसर्गिक परिस्थितीचा आढावा पाहता शासनाने सुरू केलेली ऑनलाईन खत विक्री पद्धत बंद करून शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने खत विक्री करावी जेणेकरून या आठ दिवसांत शेतीला पूरक खत मिळणे आवश्यक आहे.एकतर पेणमध्ये पंचवीस लायसन्स धारक खत विक्रेते आहेत.पण अशा प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये यासाठी त्यांनी केंद्रांवरील खतच विक्रीसाठी ठेवलेला नसल्याने त्या खत केंद्राचे लायसन्स बाद करण्यात यावेत अशी मागणी पेण शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे.

पेण तालुक्यातील जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच ऑफलाईन पद्धतीने खत खरेदी पूर्ण केली आहे आता फक्त २० टक्के शेतकऱ्यांची खत खरेदी बाकी आहे.मात्र काल दिवसभर सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना खत विक्री करण्यासाठी त्रास सहन करावा लागला पण आज शिवसेनेने केलेल्या ऑफलाईन खत विक्री बाबतचे निवेदन आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठवणार आहोत.
– सागर वाडकर- कृषी अधिकारी, पेण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.