Press "Enter" to skip to content

गणेशोत्सव काळात निर्माल्य व कचरा व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्याची भाजपा कामोठे शहराध्यक्ष नगरसेवक विकास घरत यांची मागणी


पनवेल : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या काळात कामोठे प्रभाग क्र. ११, १२ व १३ तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत घरगुती, सोसायटी तसेच सार्वजनिक गणपती मंडळे यांचे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य व अतिरिक्त कचरा वेळेत उचलला जावा अशी मागणी कामोठे भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक विकास घरत यांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली.

या पत्रात निर्माल्य व कचरा वेळेवर उचलण्यासाठी दिवसातून शक्य असल्यास २ वेळा कचरा गाड्यांची व्यवस्था करण्यात यावी, तसेच गणेशोत्सव काळात अतिरिक्त कचरा गाड्यांची संख्या वाढवून विशेष व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली.

गणेशोत्सवाच्या काळात परिसरात स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी वातावरण राहावे आणि रस्त्यांवर व सोसायटी परिसरात निर्माल्य व कचरा साचू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी अशीही विनंती करण्यात आली.

यावेळी विकास घरत यांच्या सोबत नगरसेवक प्रदीप भगत तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मयूर मोहिते हे देखील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.