Press "Enter" to skip to content

आनंदीबाई प्रदान विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नागोठणे : याकूब सय्यद

नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटी आनंदीबाई प्रधान विद्यान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. या परिषदेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा या परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिनेश व. भगत यांनी केले आहे.

सदर परिषदेसाठी बीज भाष्य करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. विश्वनाथ आर. पाटील हे उपस्थित राहणार आहेत पाच सत्रात होणाऱ्या या ई-आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये बेंगलोर येथिल व्यवसायिक व शास्त्रज्ञ डॉ. परिषोत्तम देवांग हे उपस्थित राहणार आहेत. पुढील दोन सत्र हे सहभागी संशोधक यांच्या सादरीकरणासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. पाचव्या सत्रामध्ये तैवान येथील प्राध्यापक व मूळ भारतीय असलेले डॉ. बाबासाहेब मत्सागर आपले हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक सत्रासाठी मुंबई विद्यापीठातील नामांकित महाविद्यालयांतील प्राध्यापक व शास्त्रज्ञ हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे या परिषदेच उपाध्यक्ष डॉक्टर संदेश गुरव यांनी सांगितले.

या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. श्रीकृष्ण दि. तुपारे सह कन्व्हेनर प्रा. डॉ. सतीश पाटील आणि प्रा. सौ. नीलम महाले यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. या परिषदेसाठी कोकण एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष ऍड. श्री. सिद्धार्थ एस. पाटील, कार्यवाहक ऍड. सौ. पल्लवी एस. पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय जेष्ठ संचालक सन्माननीय श्री.संजय डी. पाटील, सौ. अनिता एस. पाटील, साहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री.प्रकास पी. पाटील, सह स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य सन्माननीय श्री. नरेंद्र शेठ जैन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.