Press "Enter" to skip to content

आयडीयल फ्रेंड्स ग्रुप (दिवे – अंजुर) भिवंडी आयोजित रक्तदान शिबीर 19 वर्षे व वामनराव ओक रक्त केंद्र (ठाणे ) यांच्या विद्यमाने संपन्न


मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील )

श्री.देवश पाटील साहेब झेडपी सदस्य आणि ग्रुप यांचा सहभाग दिवे- अंजुर (भिवंडी ) रक्तदान शिबीरात सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. आलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मान व सत्कार करण्यात आला.
टीप: रक्तदान का करावे,
आपल्या एका रक्तदानाने अनेकांना जीवन दान मिळते. तुमचे वजन साधारण 50 किलो अधिक असावे. कोणतेही आजार नसावा, नियमित रक्तदान केल्याने अनेक शारीरिक व मानसिक आरोग्यविषयक फायदे होतात.प्रमुख फायदे :हृदय स्वास्थ्य सुधारते,नियमित रक्तदान केल्याने रक्ताची घनता (चिपचिपाहट) कमी होते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. नियमित रक्तदानाने आयरनचे प्रमाण नियंत्रित राहते: शरीरात आयरनचे प्रमाण अधिक वाढल्यास रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. रक्तदान केल्याने अतिरिक्त आयरन योग्य स्तरावर राहते. नवीन रक्तपेशींची निर्मिती: रक्तदान केल्यानंतर शरीरात वेगाने नवीन लाल रक्तपेशी तयार होतात, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते. कॅलरी बर्न होतात: मोफत आरोग्य तपासणी: रक्तदान करण्यापूर्वी रक्ताची व दात्याच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी (हिमोग्लोबिन, रक्तदाब, एचआयव्ही इ.) फ्री मध्ये होते. मानसिक समाधान: कोणाच्या तरी जीनोद्राचारासाठी किंवा मदतीसाठी रक्त दिल्याने मानसिक आनंद आणि आत्मिक समाधान मिळते. एक बॅग 350 मीली असते. त्याने आपल्या शरीराला काही फरक पडत नाही ते हळूहळू पुर्ववत होते.
मुंबई पत्रकार: सतिश पाटील यांनी आज सहावी वेळ रक्तदान केले.
प्रत्येकाने रक्तदान करून मानवता धर्माचे पालन करावे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.