

पेण, ता. ६ (वार्ताहर) : पेण शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लावण्यात आलेल्या ललित पाटील मित्र मंडळाच्या दहीहंडी स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांनी सलामी दिली होती त्यानंतर सुरू झालेल्या चुरशीत तालुक्यातील विठाबाई खारपाले या गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडून मान मिळविल्यामुळे सदर गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख रक्कम व पारितोषिक देऊन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दहीहंडी २०२६ या उत्सवाचे आयोजन शहरासह तालुक्यातही मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.शहरातील नगरपालिका चौकात ललित पाटील मित्र मंडळांची एक लाख आकरा हजार एकशे अकरा रुपयांची मानाच्या हंडीचे चे आयोजन केले होते.यावेळी पेणसह खालापूर, रोहा आणि अलिबाग, नवी मुंबई येथील सुमारे दहा पुरुष आणि दोन महिला गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती.संध्याकाळच्या सुमारास ढोल- ताशांचा गजरात गोविंदा पथकांचा उत्साह वाढत चालला होता.
यादरम्यान अनेक गोविंदा पथकाने सलामी देत बक्षीस मिळवली मात्र त्यानंतर आठ थर लावत विठाबाई खारपाले गोविंदा पथकाने सदर मानाची हंडी फोडण्याचा मान मिळवला यावेळी विजेत्या पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख रक्कम व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, सभापती आफ्रिन आखवारे, स्मिता पेणकर, आनंद जाधव, माजी नगरसेवक देवता साकोस्कर, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, प्रदिप म्हात्रे, भाजप शहर अध्यक्ष रविंद्र म्हात्रे, नगरसेवक मितेश शहा, अजय क्षिरसागर, हितेश पाटील, मुद्दसिर आखवारे,व आदिंसह कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Be First to Comment