Press "Enter" to skip to content

श्री क्षेत्र पळसदरी स्वामी समर्थ मठात अभिनेते विजय पाटकर यांचा सत्कार


पनवेल, दि.६ (वार्ताहर) : श्री क्षेत्र पळसदरी (पुण्यनगरी) कर्जत येथील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठात सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. मठातील आध्यात्मिक वातावरणात हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी मठाचे अध्यक्ष विक्रांत दरेकर, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, दैनिक जनखुलासाचे प्रतिनिधी राजेंद्र पाटील, माने रिसॉर्टचे मल्हारी माने यांच्यासह स्वामी समर्थ मठातील स्वामी भक्त यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय पाटकर यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मठातील धार्मिक व प्रसन्न वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.