Press "Enter" to skip to content

गटई कामगारांना व्यवसाय परवाना मिळावा म्हणून आमदार प्रशांत ठाकूर सकारात्मक ; गटई कामगारांत नवचैतन्य, शिवदास कांबळे यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल : प्रतिनिधी

चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती व्यवसाय करणारे अनुसूचित जाती प्रवर्गातील चर्मकार गटई कामगारांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा व संरक्षण मिळावे याकरता पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतर्गत व्यवसाय करणारे गटई कामगारांना परवाना मिळावा याकरता पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महानगरपालिकेत धोरणात्मक बैठक संपन्न झाली. पनवेलचे महापौर नितीनभाई पाटील, उपमहापौर सौ. पाटील मॅडम, आयुक्त मंगेश चितळे व त्यांचे सर्व सहकारी तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष बबन मुकादम, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती अध्यक्ष अजय बहिरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, गटई कामगार युनियनचे प्रतिनिधी राजकुमार डोयरीया, शंकर परदेशी यांच्यासह गटई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गटई कामगारांना 100% अनुदानावर स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतात त्याचबरोबर संत रोहिदास चर्मउद्योग विकास महामंडळाकडून अवजारे व कच्चामाल याकरता अनुदान योजना आहे. सर्व योजनांचा लाभ घेऊन आपला माझा उदरनिर्वाह चालवत उद्योगाशी निगडित व्यवसाय करण्याची संधी चर्मकार समाजातील या बांधवांना असल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने व्यवसाय परवाने द्यावेत याकरता तसा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व गटई कामगार युनियनचे अध्यक्ष माजी नगरसेवक शिवदास कांबळे महानगरपालिका यांच्याकडे करीत असून त्याला सकारात्मक प्रतिसाद आमदार प्रशांत ठाकूर व महापौर नितीन पाटील यांनीया धोरणात्मक बैठकीत दिल्यामुळे गटई कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितताई तटकरे व आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या शिफारशीनुसार महानगरपालिकेमध्ये परवाना देण्याच्या संदर्भात नगरपालिकेच्या वतीने गटई कामगारांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यानुसार 210 कामगारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या कामाला पुढे गती द्यावी यासाठी बैठकीमध्ये धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून परवाने देण्याच्या कामांमध्ये प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी तपासून गती देण्यात येईल. त्याप्रमाणे प्रशासनाने कारवाई करावी असे आदेश आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले त्याबद्दल शिवदास कांबळे यांनी त्यांचे आभार मानले असून महापौर आणि महानगरपालिका आयुक्त यांचेही आभार घटक कामगारांच्या वतीने मानण्यात आले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.