


पनवेल : प्रतिनिधी
नुकतीच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने पळस्पे फाटा ते कोन फाटा या मार्गाची पाहणी करण्यात आली.
सदर पाहणी पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुभाष पुजारी तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेंद्र पाटील कोळके डेरवली कोण येथील पदाधिकारी व नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी रस्त्यावरील वाहतूक कोंडी, रस्त्याची स्थिती तसेच सुरू असलेल्या कामाबाबत संबंधित कंत्राटदारांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी गवार कंपनीचे कंत्राटदार श्री. रोहित मलिक यांच्याशी रस्त्याच्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर रस्त्याचे काम सुरळीतपणे सुरू करण्यात आले.
सदर रस्त्याचे काम दि. ०९ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून संपूर्ण रस्ता क्लिअर करण्यात येईल आणि वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे कंत्राटदार श्री. रोहित मलिक यांनी यावेळी आश्वासन दिले.
रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाल्यास पळस्पे फाटा ते कोन फाटा मार्गावरील वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.पळस्पे फाटा ते कोन फाटा रस्त्याची पाहणी ; ९ सप्टेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.


Be First to Comment