
पेण, ता. ३१ (वार्ताहर) : पेण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत मसद ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र वसंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या अगोदरचे असणारे सभापती महादेव मानकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर हरिश्चंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी नवनिर्वाचित सभापती यांनी सांगितले की बाजार समितीच्या माध्यमातून येत्या काळात शेतकऱ्यांसह येथील विकासाला अधिक महत्त्व देत कामांमधून विकास साधणार असल्याचे सांगितले.तर यावेळी माजी सभापती महादेव मानकर, उपसभापती नितीन पाटील, जयप्रभा म्हात्रे, संदेश ठाकूर, सुरेश पाटील, कृष्णा म्हात्रे, जयवंत नारकर, रामदास घासे, शेवंती ठाकूर, संतोष चव्हाण, पूजा पाटील, महेश पाटील, सुधीर पाटील, सतीश पाटील, काशिनाथ पाटील तसेच बाजार समितीचे सचिव पुरुषोत्तम पाटील आदि उपस्थित होते.यावेळी अनेकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


Be First to Comment