Press "Enter" to skip to content

मयूर वनगे हल्ला प्रकरण आरोपी अजूनही मोकाट ; आरोपींना अटक करून कलम १०९ दाखल करा

योग्य रीतीने तपास सुरू आहे लवकरच त्यांना अटक होईल — पोनि.संदीप भोसले

पेण, ता. ३० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील कामार्ली येथील मयूर वनगे यांच्यावर दि. १ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास वनगे फार्म हाऊस येथे आरोपी मंगेश दळवी व त्यांच्या तीन साथीदारांनी हल्ला करून त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने त्यांच्या दोन्ही हातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.मात्र या प्रकरणातील आरोपी आजही मोकाट असल्याने अखेर स्वतः फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी पेण पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत सदर आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर १०९ कलम लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी मयूर वनगे आपल्या मालकीच्या कामार्ली- कुरमुरर्ली च्या फार्महाऊसवर रात्री जेवण आणण्यासाठी जाऊन ते तीथल्या किचनमध्ये बसले असता पाठीमागून आलेले मंगेश दळवी, हरेष दळवी, रुपेश दळवी आणि रंजीत दळवी या चौघांनी पूर्ववमान्यासातून त्याला लोखंडी रॉड, पाईप व लाठी काट्यांसह तलवारीने जोरदार मारझोड केली त्याला तातडीने पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तीथे त्याच्या दोंन्ही हातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.मात्र आता जवळपास एक महिना होत आला तरीही आरोपी मोकाट असून यातील एकाला जामीन सुद्धा मंजूर झाला आहे त्यामुळे इतर तिघांना जामीन न होता पोलिसांनी अधिकचा तपास सुरू करून त्यांना तात्काळ अटक करावी आणि सदरची मारहाण पाहता त्यांच्यावर १०९ कलम लावण्यात यावे अशी मागणी स्वतः फिर्यादी मयूर वनगे यांच्यासह नातेवाईकांनी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मयूर वनगे यांना झालेल्या मारहाणीच्या बाबत सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून योग्य रीतीने सुरू असून यातील रंजीत दळवी याला जामीन मंजूर झाला आहे उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला लोकेशन येतोय त्या ठिकाणी आम्ही तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आहोत लवकरच आरोपी पोलीसांच्या ताब्यात असतील.

संदीप भोसले- पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.