Press "Enter" to skip to content

नागोठणे गावात मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद -ए मिलादुन्नबी थाटात मुस्लिम बांधवांनी केली साजरी

नागोठणे प्रतिनिधी ( याकूब सय्यद)

हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ (किंवा मिलादुन्नबी) म्हणून साजरी केली जाते.महत्त्वाची माहितीदिनांक: ही जयंती इस्लामिक चंद्र कॅलेंडरमधील (हिजरी कॅलेंडर) ‘रबी-उल-अव्वल’ महिन्याच्या १२ व्या दिवशी येते.जन्म: इस्लामिक मान्यतेनुसार, पैगंबर मोहम्मद यांचा जन्म ५७० किंवा ५७१ ईसवी मध्ये मक्का येथे झाला.ओळख: ते इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित (पैगंबर) मानले जातात. त्यांच्यामार्फत अल्लाहने ‘कुराण’ हा पवित्र ग्रंथ माणसांपर्यंत पोहोचवला.साजरी करण्याची पद्धतरोषणाई: या दिवशी मशिदी आणि रस्ते सुंदर रोषणाईने उजळून निघतात.

शोभायात्रा: अनेक शहरांमध्ये मुस्लिम बांधवांतर्फे उत्साहात मिरवणुका (जुलूस) काढल्या जातात.धार्मिक कार्यक्रम: मशिदींमध्ये व धार्मिक स्थळांवर विशेष प्रार्थना, मिलाद मेहफिल (प्रार्थना सभा) आणि पैगंबरांच्या जीवनावरील व शिकवणीवरील व्याख्याने आयोजित केली जातात.दानधर्म: गरिबांना अन्नदान करणे आणि समाजसेवा करणे या दिवशी खूप पुण्यकारक मानले जाते.

याही वर्षी नागोठणे गावात तमाम मुस्लिम बांधवांनी संध्याकाळी चार वाजताची असरची नमाज जामा मस्जिद नागोठणे मध्ये पठण करून भव्य असे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून जुलूस मिरवणूक काढली होती त्या जुलूस मिरवणुकीत नाते शरीफ पोती वाचन करीत मोठ्या उत्साहात सुगंधित लोबान धुराची फवारणी करीत तसेच घराघरा जवळ शरबत तसेच दुधाचे ड्रायफ्रूट काजू बदाम शुरकुर्माचे थंड पेय मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत हजरत मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी यांना वाटप करण्यात आले. त्यानंतर ठीक संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान जमा मस्जिद नागोठणे येथे जुलूस मिरवणुक आल्यानंतर जामा मशीद चे इमाम जवाद मापकर साहेब यांनी हजर मोहम्मद पैगंबर-यांवर दरूदे शरीफ सलाम पेश केली अर्पित केली त्यानंतर हजरत मोहम्मद पैगंबर यांची जुलूस मिरवणुक समाप्त केल्यानंतर त्याच रात्री नागोठणे गावातील सर्व मुस्लिम बांधवांना मटणाच्या जेवणाचा (नियाज) प्रसाद म्हणून आयोजन करण्यात आला होता त्यावेळी मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव यांनी (नियाज) प्रसादाचा लाभ घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.