Press "Enter" to skip to content

कॉंग्रेस भवन पनवेल येथे स्वामिनी आणि प्रेरणा बचत गटांच्या वतीने श्रावण सखी कार्यक्रम उत्साहात संपन्न

कॉंग्रेस भवन पनवेल येथे श्रावण सखी कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्रावण सखी कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वामिनी आणि प्रेरणा बचत गटांच्या वतीने हळदी-कुंकू, मान्यवरांचा सत्कार, प्रश्नमंजुषा यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन कॉंग्रेस भवन पनवेल येथे करण्यात आले. सणासुदीच्या काळातील वाढती महागाई लक्षात घेऊन महिलांना घरगुती वापरासाठी उपयुक्त अशा गूळ व रवा या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक १४च्या नगरसेविका मनिषाताई म्हात्रे आणि कुमारी आर्या जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच विधी सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष के. एस. पाटील, पनवेल महापालिकेचे माजी जिल्हाध्यक्ष सुदामभाई पाटील, पर्यावरण सेलचे पनवेल अध्यक्ष सुरेश पाटील, पनवेल ब्लॉक अध्यक्ष डॉ. अमित दवे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सरोजताई ढाकी, विचार विभागाच्या रायगड जिल्हाध्यक्षा अनिताताई शेणाय यांच्यासह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी प्रश्नमंजुषा तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन व संकल्पना निर्मलाताई म्हात्रे यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.