Press "Enter" to skip to content

३० ऑगस्टला पनवेलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे विशेष व्याख्यान व मुलाखत


पनवेल (प्रतिनिधी): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (रायगड-अलिबाग), तालुका विधी सेवा समिती (पनवेल) आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय मा न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांचे ‘विशेष व्याख्यान व मुलाखत च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे पार पडणार असल्याची माहिती पनवेल बार अससोसिएशन चे अध्यक्ष ऍड रत्नदीप पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली

या विशेष कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा. श्री. अभय श्रीनिवास ओक साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून त्यांची मुलाखतही घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री. श्रीनिवास बी. अग्रवाल (मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग) आहेत तर प्रमुख उपस्थिती:
मा. श्री. विमलनाथ सा. तिवारी (मा. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पनवेल)
मा. श्रीमती रेवती म. कंटे (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग) उपस्तिथ राहणार आहेत
कायदा आणि न्याय क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी वकील वर्ग, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक मा. ॲड. श्री. रत्नदीप राम पाटील (अध्यक्ष, पनवेल बार असोसिएशन) व संपूर्ण कार्यकारिणी आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेस पनवेल बार असोसिएशनचे चे अध्यक्ष
अ‍ॅडव्होकेट रत्नदीप पाटील , सचिव अ‍ॅडव्होकेट प्रल्हाद खोपकर , उपाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट ,सचिन म्हात्रे ,सहसचिव अ‍ॅडव्होकेट. दिपाली गावंड ,खजिनदार अ‍ॅडव्होकेट धनराज तोकडे ,सहखजिनदार अ‍ॅडव्होकेट
विशाल डोंगरे ,ऑडिटर अ‍ॅडव्होकेट भुषण म्हात्रे ,सदस्य अ‍ॅडव्होकेट
विजयेंद्र मुंढे ,सदस्य अ‍ॅडव्होकेट इरशाद शेख , सदस्य अ‍ॅडव्होकेट ज्योती उरणकर , सदस्य अ‍ॅडव्होकेट छाया म्हात्रे ,अ‍ॅडव्होकेट प्रज्ञा भगत , अ‍ॅडव्होकेट शैलेश कोंडुसकर आदी उपस्थित होते.

माजी न्यायमूर्ती अभय ओक साहेबांचा अल्प परिचय…
माजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक (Abhay S. Oka) हे भारताच्या न्यायिक क्षेत्रातील अत्यंत आदरणीय, अभ्यासू आणि निस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. २५ मे २०२५ रोजी ते सर्वोच्च न्यायालयातून सेवावृत्त झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी दिलेले निर्णय हे केवळ कायद्याच्या चौकटी पुरते मर्यादित न राहता, त्यांनी नागरिकांचे मूलभूत अधिकार, पर्यावरण रक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले.

मुख्य परिचय व पार्श्वभूमी

जन्म व शिक्षण: २५ मे १९६० रोजी ठाणे (महाराष्ट्र) येथे जन्म. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एल.एल.एम. (LL.M.) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
वकिली कारकीर्द: १९८३ पासून त्यांनी ठाणे जिल्हा न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
परप्रांतीय मजुरांची सोय याबाबत सरकारला वेळोवेळी आदेश देऊन सामान्य नागरिकांना थेट मदत पोहोचवली.
४. रस्त्यांवरील खड्डे आणि नागरिकांचे हक्क (मुंबई उच्च न्यायालय)

मुंबई उच्च न्यायालयात असताना त्यांनी दिलेला “खड्डेमुक्त रस्ते आणि चांगले पदपथ हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे” हा निर्णय अत्यंत गाजला.
मुंबई महापालिका व राज्य सरकारला त्यांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवरून अनेकदा धारेवर धरले होते.
५. ध्वनी प्रदूषण आणि धार्मिक उत्सव

सण-उत्सवांच्या काळात होणाऱ्या तीव्र ध्वनी प्रदूषणावर त्यांनी कडक निर्बंध लादले. “ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरण हा नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी सायलन्स झोन (Silence Zone) चे नियम कडकडीत अमलात आणले.
त्यांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये

न्यायालयाचे काम मराठीतून व प्रादेशिक भाषेत: न्यायमूर्ती ओक यांनी न्यायदानाच्या प्रक्रियेत स्थानिक भाषेचा वापर वाढावा यासाठी नेहमी पुढाकार घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय प्रादेशिक भाषांमध्ये (विशेषतः मराठीत) अनुवादित करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी गती दिली.

कायद्याची अचूकता व निस्पृहता: कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून ठाम निर्णय देणे ही त्यांची ओळख होती.
सर्वसामान्यांना न्याय: प्रशासकीय निष्काळजीपणामुळे सामान्य माणसाची पिळवणूक होणार नाही याची त्यांनी नेहमी काळजी घेतली.
वेळेचे नियोजन: त्यांच्या न्यायालयात वेळेचे कडक पालन केले जाई आणि प्रलंबित खटले त्वरित निकाली काढण्यावर त्यांचा भर होता.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.