Press "Enter" to skip to content

‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियांका वैभव मालुसरे प्रथम


पनवेल, दि. २६ (वार्ताहर) : साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप यांच्या पुढाकाराने पनवेल येथील चंदूकाका सराफ येथे ‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्त्वाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत रियांका वैभव मालुसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘श्रावण क्वीन २०२६’चा मान मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

महिलांच्या कलागुणांना आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाला नगरसेविका कु. आर्या प्रविण जाधव यांचीही उपस्थिती होती.
साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी विविध सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.