
पनवेल, दि. २५ (वार्ताहर) : अभिनव युवक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या तयारीला उत्साहात सुरुवात झाली. लाडक्या गणपती बाप्पाच्या मंडपाचा मुहूर्त व वास्तुपूजन शहरातील पायोनिअर विभागातील मैदानात विधिवत पार पडले. मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अभिनव युवक मित्र मंडळ गेल्या ३५ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपत असून, दरवर्षी आकर्षक सजावट, नावीन्यपूर्ण देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिला भगिनींसाठीही विविध उपक्रम राबवून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष तथा महापौर नितीन जयराम पाटील, अध्यक्ष अल्पेश पडावे, उपाध्यक्ष रुपेश नागवेकर, खजिनदार मयुर चिटणीस, तसेच उमेश इनामदार, पत्रकार संजय कदम, महेश सरदेसाई, शैलेश कदम, राजा चव्हाण, सचिन नाझरे, सुधीर देसाई, युवराज कदम, नरेंद्र सोनवणे, हितेश पडावे, प्रवीण सावंत, राहुल सोळंकी, जॉनी जॉर्ज, बाबू डिसूझा, मंगेश चंदने यांच्यासह पनवेल महापालिकेचे स्वच्छता दूत उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत मंडपाच्या मुहूर्ताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यंदाही गणेशभक्तांसाठी आकर्षक सजावट, नावीन्यपूर्ण देखावे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.



Be First to Comment