Press "Enter" to skip to content

नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

पनवेल : प्रतिनिधी

कॉलसेंटरद्वारे कर्ज देणे , विविध आमिषाचे नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी उघडकीस आणून ०४ आरोपींना अटक करून जवळपास ०४ लाखांचा मुद्देमाल जप्त केलेबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे परीसरात काही ईसम एका भाडयाचे फलॅटमध्ये राहून त्यांचेकडील लॅपटॉप , मोबाईल फोन व इंटरनेचा वापर करून कॉल सेंटर चालवत असुन ते स्वतःची ओळख लपवून सर्वसामान्य नागरिकांना संपर्क करून धनी फायनान्स व इतर फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून , त्याद्वारे त्यांना लोन मंजूर करतो असे सांगुन प्रोसेसिंग फी , इन्शुरन्स , होल्डींग चार्ज , जी . एस . टी . चार्ज अशी विविध खोटी कारणे सांगून त्यांचेकडून स्कॅनरद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे घेवून मोठया प्रमाणात सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत असलेल्या टोळीबाबत पनवेल शहर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली .

सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे , सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई , कळंबोली पोलीस ठाणे यांचे एक पथक बनविण्यात आले . मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दिनांक २१/०८/२०२६ रोजी सायंकाळी ०७.०० वा . च्या सुमारास निलगिरी अपार्टमेंट , रूम नं . ४०१ सेक्टर आर ४ , प्लॉन नं २४ , करंजाडे , ता . पनवेल जि . रायगड येथे छापा टाकला असता तेथे १ ) विजय बाबू भंडारी वय ३६ वर्षे , धंदा रियल इस्टेट , रा . रूनं ५०६ , जे व्ही हाईटस , प्लॉट नं ३७ , सेक्टर ३ , करंजाडे , ता . पनवेल जि . रायगड मोन ८२८६७२५०५१ , ८ ९ २८ ९ ६४३ ९ ६ . २ ) तुषार अरूण पिंगळे , वय ३४ वर्षे , धंदा व्हिडीओ एडिटींग , रा . रूनं ४०२ . समर्थ आंगण , प्लॉट १७ , सेक्टर और ४ , करंजाडे , ता . पनवेल जि . रायगड . मोनं ९९ २०५६२३८ . ९९ ६७१८७६७७ . ३ ) रोहित रंगाप्पा गौडा , वय २१ वर्षे , धंदा नेटवर्क मार्केटिंग , रा . ईडब्ल्यूएस १६ ९ , वॉर्ड नं ५ , रामपूर रोड , मरीअम्मा मंदीराजवळ , निजलिंग आप्पा कॉलनी , रायचूर , मोनं ८१४७८५१३०१. ४ ) दर्शन उमाशंकर वय २१ वर्षे , धंदा नाही , रा . १-११-४१ / १ ९ , यकलासपूर रोड , स्वामी विवेकानंद कॉलनी , रायचूर , कर्नाटक असे चार ईसमांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेकडे सदर गुन्हे करण्याकरीता वापरण्यात येत असलेले ०३ लॅपटॉप , १५ मोबाईल फोन्स , विविध व्यक्तींच्या नावावर असलेले ७ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड्स , ३१ सिमकार्ड्स , रोख रक्कम ७४,४०० / -रु , हिशोबाच्या २ वह्या , १ डायरी , वायफाय राउटर , नेटवर्क टर्मिनल डिव्हाईस असे एकूण किंमत ३ , ९ ५,५०० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

सदरची कारवाई श्रीमती रश्मी नांदेडकर , पोलीस उप आयुक्त परीमंडळ क ०३ , श्री मथुर भुजबळ , सहा . पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळा कुंभार , पोलीस निरीक्षक श्री शाकीर पटेल ( गुन्हे ) , पोलीस निरीक्षक अभिजीत अभंग ( प्रशा ) आणि पनवेल शहर पोलीस ठाणेचे सपोनि अजित बिरादार , पोहवा धीरज थवई , पोशि विदयाधर गायकवाड , पोशि अजय पाटील , मपोशि साधना पवार , सायबर पोलीस ठाणेचे पोउपनि अभय कदम , कळंबोली पोलीस ठाणेचे पोउपनि अभय काळे , गपोहवा देसाई , पोशि पाटील यांनी केली आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.