Press "Enter" to skip to content

पनवेल पोलीसांनी ४८ तासाच्या आत अपहार झालेले ६६ तोळे सोने व आरोपीला सोलापुर मधुन घेतले ताब्यात

पनवेल : प्रतिनिधी

दिनांक २०/०८/२०२५ रोजी पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉप मधील कामगार शुभम मनाजी खिलारे याने त्यास फिर्यादी यांनी सोन्याची शुध्दता तपासण्याकरीता दिलेले एकुण ६६,६२,३०० / – रूपये किमतीची ६६६.२३ ग्रॅम वजनाची ०६ सोन्याची लगड वा आरोपीत याने अप्रामाणिकपणे अपहार केल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दिनांक २१/०८/२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .

सदर घटनेचे गांर्भिय लक्षात घेवुन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळा कुंभार यांनी पोलीस पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन आरोपीत याचा शोध घेण्याकरीता रवाना केले पोलीस पथकाने पनवेल शहर व रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून तसेच तांत्रिक तपास करून आरोपीचा माग काढला असता आरोपीत हा कुरुडवाडी , सोलापुर येथे ट्रेन • मधुन उतरल्याचे दिसुन आले . पोलीस पथकाने आरोपीत याचा माग काढत त्याचे मुळ गाव खिलारवाडी , ता . सांगोला , जि . सोलापुर येथे जावुन आरोपीत याचा शोध घेवून आरोपीत शुभम मनाजी खिलारे यास ताब्यात घेवुन त्याने अपहार केलेला गुन्हयातील गेला माल ६६६.२३ ग्रॅम वजनाची ०६ सोन्याची लगड हस्तगत करण्यात केला आहे.

सदरची कार्यवाही मा . पोलीस उप आयुक्त श्रीमती रश्मी नांदेडकर , परिमंडळ ०३ , पनवेल , मा . सहा . पोलीस आयुक्त श्री . मधुर भुजबल , पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाला कुंभार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री . शाकिर पटेल , पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) अभिजीत अभंग , पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे पकटीकरण पथकातील सपोनि / अभिजीत पाटील , पोउपनि / हजरत पठाण , पोउपनि / किरण राऊत , पोहवा / १३७८ अविनाश गंथडे , पोहवा / ११२३ योगेश दिवेकर , पोहवा / २२२८ अमोल पाटील , पोहवा / २३२६ संदेश म्हात्रे , पोना / ३२ ९ ५ मिथुन भोसले , पोशि / ४०३३ किरण कराड , पोना / ३०५४ सोमनाथ म्हात्रे , पोशि / ३०७० शशिकांत काकड यांनी केली आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.