

ग्राहकांची सुरक्षितता याच आमचा कानमंत्र आहे- व्यवसाय प्रमुख आशिष गुप्ता
पेणकरांसाठी कमी व्याजदरात चांगल्या सुविधा द्या- नगराध्यक्षा प्रीतम पाटील
पेण, दि. 22 (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील पेण तालुका हा तिसरी मुंबई म्हणून ओळख होत असताना आमची पुनावाला फिनकॉर्प गोल्ड लोन शाखा 6 वी असून आजवर देशात 461 आणि महाराष्ट्रात 65 शाखा आहेत त्यामुळे आमच्या ग्राहकांची सुरक्षितता हाच आमचा कानमंत्र असल्याचे प्रतिपादन व्यवसाय प्रमुख आशिष गुप्ता यांनी यावेळी केले.
पेण येथील नगरपालिका इमारतीच्या खाली पूनावाला फिनकॉर्प गोल्ड लोन शाखेचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.या कार्यक्रमाला नगरसेवक हितेश शहा, वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर, विभागीय शाखा प्रमुख सुनील सोनवले, विभाग प्रमुख सुरेश पाटील, प्रॉडक्ट मॅनेजर शशांक उनेरकर, एरिया हेड गणेश सर आदिंसह बॅकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तर यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील म्हणाले की या शहरात पूनावाला फिनकॉर्पची शाखा सुरू होणे ही पेणकरांसाठी अभिमानाची बाब असून या शाखेने पेणकरांना चांगल्या सुविधा द्या जेणेकरून स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा आर्थिक संकटाच्या प्रसंगी ही शाखा कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाखेच्या माध्यमातून सन्मान करण्यात आले.





Be First to Comment