

पनवेल : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइटच्या सहकार्याने ‘आशा की किरण – Samvaad on Maternal & Child Health’l या विशेष प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “Healthier Mothers. Brighter Children. Stronger India.” या संदेशावर आधारित या उपक्रमाचा उद्देश आशा सेविकांना माता व बाल आरोग्याबाबत अद्ययावत माहिती व मार्गदर्शन देऊन त्यांच्या कार्याला अधिक सक्षम करणे हा होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 120 आशा सेविकांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील तज्ज्ञ वक्ते:
- डॉ. चित्रा कुलकर्णी — बालकांचे पोषण व आहार (Feeding in Infants and Children)
- डॉ. शिल्पा गांधी — बालकांच्या विकासाचे निरीक्षण (Developmental Monitoring)
- डॉ. शोभना पालेकर — गर्भवती व प्रसूतीनंतरच्या महिलांचे पोषण (Nutrition in Pregnant and Post Delivery Females)
- डॉ. स्वाती लिखिते — लसीकरणाचे महत्त्व (Importance of Vaccines)
या उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन ध्वनी तन्ना असून, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री. प्रकाश पाटील, आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने 120 आशा सेविकांना साड्या भेट देण्यात आल्या. तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइट या दोन्ही क्लबच्या वतीने सर्व आशा सेविकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी इनर व्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) यांना प्रत्येकी एक अशा एकूण दोन सेट्स पल्स ऑक्सिमीटर व BP उपकरणांचे वाटप करण्यात आले. या उपकरणांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य तपासणीच्या सुविधांना बळकटी मिळणार आहे.
यावेळी सर्व आशा सेविकांना मातृ व बाल आरोग्यविषयक प्रशिक्षण पुस्तिकेचेही वाटप करण्यात आले. या पुस्तिकेमध्ये माता व बालकांचे आरोग्य, पोषण, गर्भावस्था, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी तसेच बाल आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
रोटरी सदस्यांची उपस्थिती
रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी तर्फे
अध्यक्ष रोटेरियन भावेश रंगपरिया, रोटेरियन Cdr. दीपक जांबेकर आणि Secretary रोटेरियन ध्वनी तन्ना उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइट तर्फे
अध्यक्ष रोटेरियन राजेश मेहता, रोटेरियन नवीन चौधरी आणि डॉ. शैलाश्री केळकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला डॉ. अपर्णा पवार, तालुका आरोग्य अधिकारी, यांची विशेष उपस्थिती लाभली.
‘आशा की किरण’ या उपक्रमाच्या माध्यमातून आशा सेविकांना माता व बाल आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर सन्मान, आवश्यक आरोग्य उपकरणे आणि सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले. निरोगी माता, निरोगी बालक आणि सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.





Be First to Comment