
पेण, दि.18 ( प्रतिनिधी ) -: द्रोनागिरी स्पोर्ट असोसिएशन आयोजित वर्षा मॅरेथॉन २०२६ च्या स्पर्धेत सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल उलवे, नवी- मुंबई येथील विद्यार्थिनी अर्वी ज्ञानेश्वर मिरकुटे हिने सात वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
इयत्ता ३ री अ मध्ये शिकणारी अर्वी मिरकुटे हि लहान पणापासून शिक्षणाबरोबरच खेळांमध्ये तरबेज असल्याने नुकत्याच झालेल्या द्रोनागिरी स्पोर्ट असोसिएशन आयोजित वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत
सात वर्षाखालील गटामध्ये तीने प्रथम पटकावला असल्याने असोसिएशनच्या वतीने तीला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच इतरही बक्षिसे देऊन तीचा गौरव करण्यात आला यावेळी अर्वी हिचा शाळेतील शिक्षिक, कर्मचारी तसेच नागरिकांकडूनही अभिनंदन करण्यात आले.




Be First to Comment