Press "Enter" to skip to content

सीएफआय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव ; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सीएफआय संस्था प्रेरणादायी आहे- आमदार अनिकेत तटकरे

पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून सीएफआय संस्था काम करत असताना संस्थेने आजवर असंख्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून उच्च स्तरावर नेण्याचे काम केले असल्याने ही संस्था विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.

पेण येथील चिल्ड्रन फ्युचर ऑफ इंडिया आणि इंडियाज बर्न यांच्या संयुक्त विद्यमाने आज दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सीएफआयचे प्रमुख डॉ. किशोर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर आदिंसह विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर यावेळी जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील म्हणाले या संस्थेला डॉ.देशमुख यांने आपल्या मेहनतीने उंच स्तरावर पोहोचविले आहे जिल्हा परिषदेच्या सत्तेवर बसल्यावर लागलीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या इंग्रजी माध्यमचे लॅब तसेच शाळा व्यवस्थापन जास्त भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.